आपला भारत देश कृषिप्रधान देश म्हणन ओळखला जातो,परंतु याच कृषी प्रधान देशात अनेक शेतकरी आत्महत्या करत असतात. आत्महत्येसाठी अनेक वेगवेगळी कारणे आहेत. कोणी कर्जबाजारी झालो म्हणून आत्महत्या करतो तर कोणी शेती मध्ये नुकसान झाले म्हणून. परंतु अशा सर्व संकटांना प्रतिउत्तर देत आपल्या महाराष्ट्रातील एका शेतकऱ्यांने लाखो रुपये कमावले.
सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे मध्ये राहणारे विनायक हेमाडे याची शेतजमीन आहे .सध्या पावसाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे त्यानी कोथिंबीर या पीकाला पसंती दिली . योग्य वेळ आणि कमी वेळेत जास्त उत्त्पन्न असल्यामुळे त्यानी विचारपुर्वक चार एकर मध्ये कोथिंबीर लावायचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ४८ किलो बियाणे लागले त्यासाठी त्यांना ४८ किलो बियाणे लागले आणि साधारणतः ४०हजार रुपये पर्यत खर्च आलेला आहे. लागवडीनंतर ४० दिवसांमध्ये किथिंबीर परिपक्व झाली .
तयार झालेली कोथिंबीर मार्केट ला न नेहता जाग्यावरच विकण्याचे ठरवले. अनेक व्यापारी येऊन पाहून हि गेले. त्यानंतर दापुर येथील व्यापारी शिवाजी यांनी कोथिंबीर पिकाची पहाणी केली. आणि चार एकर कोथिंबिरीचा सौदा साडे बारा लाखाला ठरला.
विनायक हेमाडे याचे कष्ट आणि त्याना मिळालेली नशिबाची साथ त्यामुळे आज ते लखपती झाले.
प्रत्येक शेतकऱ्यांचा एक दिवस नक्की येणार. आपल्या मालाला आपण सांगेल तेव्हडाच भाव भेटणार
एक टिप्पणी भेजें