जेव्हा आपण कोंबडी पालन करण्याचा विचार करतो तेव्हा आपणास माहित नसते कि कोणत्या प्रकारचे पोल्ट्री फार्म आपण करायला हवे तर त्यासाठी आजचा विषय आहे कि कोंबडी पालन करण्यासाठी कोण कोणते प्रकार असतात 

प्रकार - एक 

बॉयलर कोंबडी पालन -

मांसासाठी सर्वात जास्त करण्यात येणारे  कोंबडी पालन म्हणजे बॉयलर कोंबडी पालन. बॉयलर कोंबडी पालन करताना आपणस कमी दिवसात जास्त फायदा मिळतो. बॉयलर कोंबडी हि ४५ दिवसांमध्ये विक्रीस येते. यामध्ये एका पिल्लाची किंमत ४० ते ४२ रुपये आहे .बॉयलर पक्षी हे जास्त संख्या मध्ये घ्यावे म्हणजेच एक हजारच्या पट्टीमध्ये घ्यावेत.  बॉयलर पक्षांमध्ये नेट प्रॉफीट प्रति किलो कमीत कमी ४०रु. मिळते. यामध्ये मरतुकेचे प्रमाण हे ६% असते. बॉयलर पोल्ट्री मध्ये भांडवल जास्त प्रमाणात गुंतवावे लागते. या फार्मिंग मध्ये होलसेल व्यापारी खूप मिळतात तसेच मोठं मोठ्या कंपनीसोबत करार सुद्धा करता येतात.  



 प्रकार दोन 

गावरान पोल्ट्री - गावरान पोल्ट्री फार्म चालू करताना पूर्ण प्लॅन असणे आवश्यक आहे. बॉयलर फार्म पेक्षा गावरान फार्म मध्ये पक्षी मोठा  व्हयला वेळ लागतो. १ दिवसाचं पिल्लू आणल्यापासून विक्री होईपर्यंत ३महिने वेळ लागतो. या तीन महिन्यात एका कोंबडीच वजन १किलो होते आणि कोंबडा १. ५ किलो होतो गावरान कोंबडीला १५० ते २०० किलो भाव मिळतो.




प्रकार ३ - लेअर पोल्ट्री फार्म 

ज्यावेळेस आपण कोंबडी पालन हे अंड्यासाठी करत असतो तेव्हा त्याला लेअर फार्मिंग म्हंटले जाते. लेअर फार्मिंग हे गावरान कोंबड्याना घेऊन करू शकता किंवा लेअर फार्मिंग साठी वेगळ्या जातीच्या कोंबड्या सुद्धा भेटतात. अंडी उत्पादनातून चांगला नफा मिळू शकतो. 

Post a Comment

और नया पुराने