माझे नाव दिव्यांक होले आहे. मी मागील वर्षी सप्टेंबर 2019 ला पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. तीनशे पासून सुरू केलेला व्यवसाय हा एका वर्षात एक हजार पक्षां न पर्यंत येऊन ठेपलेली आहे. माझ्या पोल्ट्री फार्म वर ओरिजनल डीपी, कडकनाथ, का करेल, व बटेर इत्यादी जातीचे पक्षी मिळतात. माझा पोल्ट्री फार्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात आहे. दर्यापूर पासून पाच किमी अंतरावर ठीलोरी या गावी माझा पोल्ट्री फार्म आहे. माझे शिक्षण बीएससी कंप्यूटर झालेले आहे. मागील वर्षी 2019 मध्ये माझे शिक्षण पूर्ण झाले व मी पोल्ट्री व्यवसायात उतरलो.
कुठलेही प्रशिक्षण न घेता यूट्यूब च्या माध्यमातून माहिती गोळा करून तुटपुंज्या भांडवली 300 पक्ष्यांपासून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. चार महिन्यांनी हळूहळू पोल्ट्री व्यवसाय रुळावर येत असतानाच अचानक चिकन खाल्ल्याने कोरोना होतो या अफवेमुळे चिकनच्या मागणीत एकदम मोठ्या प्रमाणात घटली. त्यावेळी माझ्याजवळ 500 पक्षी विक्रीसाठी उपलब्ध होते. पहिल्यांदाच थोडी भीती वाटली परंतु त्यानंतर डगमगून न जाता मिळेल त्या भावाने कमीजास्त करून मी ते पाचशे पक्षी विकले व दोन महिने पोल्ट्री व्यवसाय बंद ठेवला. त्यानंतर पुन्हा मे च्या अखेरीस पोल्ट्री व्यवसायात उतरलो. मी दर महिन्याला तीनशे किंवा ५०० अशी पक्ष्यांची बॅच टाकतो ज्यामध्ये कळकनाथ कॉकरेल डीपी बटेर या पक्षांचा समावेश असतो. व्यवसायाचे अर्थ गणित सांगायचे झाले तर एक दिवसाचे पिल्लू 20 ते 25 रुपये या भावात मिळते. ते घरी आल्यानंतर सात ते पंधरा दिवस त्यांना ब्रूडिंग करावे लागते.ब्रूडींग झाल्यानंतर पंचविसाव्या दिवशी चोच कटिंग करून पक्षी दुसऱ्या ब्रॉक मध्ये शिफ्ट केले जाते.त्या ब्लॉक मध्ये एक महिन्यानंतर एक किलो वजनाचे पक्षी झाल्यास त्यांना नंबर 3 मध्ये शिफ्ट केले जाते तिथून त्या पक्ष्यांची विक्री केली जाते. एक किलो एवरेज वजन येण्यासाठी ओरिजनल डीपी गावरान पक्षांना साधारण साडेतीन ते चार किलो खाद्य लागते. खाद्याचे प्रमाण पाणी व स्वच्छता यावर अवलंबून असते. तीन पर्सेंट मरतूक झाल्यास व बोर्डिंग लसीकरण औषध हा सर्व खर्च पकडून एक पक्षी तयार करण्यासाठी साधारण 160 ते 180 रुपये खर्च येतो. व 70 दिवसात सर्व पक्षी एक किलोचे होतात कोंबडे एक किलो होण्यासाठी 55 ते 60 दिवस घेता.
अशाप्रकारे शेतकऱ्याने कुक्कुटपालन हा शेतीपूरक व्यवसाय करून स्वतःसाठी शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करू शकतो. व्हिडिओमध्ये दिसणारे पांढरे पक्षी म्हणजे का करेल पक्षी आहे ज्याला कॉकरेल फार्मिंग असेही म्हणतात. लेअर फार्मिंग साठी वापरल्या जाणाऱ्या पक्ष्यांमधील नर पक्षी वेगळे काढून त्यांची विक्री कमी भावात केली जाते व त्या पक्षांचे फार्मिंग म्हणजे काकरेल फार्मिंग होय. का करेल फार्मिंग चा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याचे एक दिवसाचे पिल्लू अतिशय स्वस्त भावात मिळते कमी कॉन्टिटी घेतल्यास थोडे महाग पडते परंतु जास्त कंट्री घेतल्यास दोन ते तीन रुपये नगाप्रमाणे ह पिल्लू पडते. काकरेल फार्मिंग च्या दुसरा एक फायदा म्हणजे अनेक लोकांचा कल हा कोंबडा खरेदी करण्याकडे जास्त असतो त्या अनुषंगाने या फार्मिंग मध्ये संपूर्ण कोंबडे असल्यामुळे तोही एक फायदा कोकरे फार्मिंग मध्ये आपल्याला होतो. काकरेल फार्मिंग गावरानी तसेच लेयर फार्म च्या नरांमध्ये सुद्धा केली जाऊ शकते.कॉकरेल फार्मिंग ठोक बाजारभावात किंमत कमी असून चिल्लर मध्ये विक्री केल्यास त्यामध्ये चांगल्या प्रकारे नफा मिळवला जाऊ शकतो. ओरिजनल डीपी फार्मिंग मध्ये चिल्लर मध्ये विक्री केल्यास तुम्हाला पन्नास ते सत्तर रुपये एवढा नफा येतो व ठोक मध्ये विक्री केल्यास तीस ते चाळीस रुपये किलोमागे नफा मिळतो.
तसेच आमच्याइथे चौथ्या ब्लॉक मध्ये आम्ही अंड्यांसाठी कोंबड्या ठेवलेले आहे दीडशे कोंबड्यांपासून सर्वसाधारण रोज शंभर अंड्यांचे उत्पादन होते. खाद्याचे रेट व इतर खर्च पकडून सहा रुपयात एक अंडे तयार होते बाजारभावात तेच अंडे आठ-नऊ रुपयात विकले जाते चिल्लर मध्ये अंड्याचा भाव दहा रुपये मिळतो. चिल्लर मध्ये विक्री केल्यास नगा मागे आपल्याला तीन ते चार रुपये मिळतात व ठोक मध्ये दोन ते तीन रुपये मिळतात.dp गावठी कोंबडी अंड्यावर येण्यासाठी साडेचार महिने ते पाच महिन्याचा कालावधी लागतो व डीपी गावरान पक्षी जर तुम्ही अंड्याचे वागत असाल तर दोन वर्ष तुम्ही अंडी उत्पादन एका कोंबडी पासून घेऊ शकता. ओरिजनल डीपी पक्षी वार्षिक 160 ते 180 अंडे देतो पुढील वर्षी थोडे कमी करतो अंडी देणे झाल्यानंतर तुम्ही तो पक्षी दीडशे ते दोनशे रुपये किलो या भावाने विक्री सुद्धा करू शकता. या हिशोबाने एखाद्या शेतकऱ्याने अंड्यांसाठी कुक्कुटपालन करायचे म्हटले तर दीडशे कोंबड्यांना घेतो आठ ते नऊ हजार रुपये महिन्याचे उत्पन्न मिळवू शकतो व हळूहळू कोंबड्या वाढून त्याचे उत्पन्न वाढवू शकतो 150 कोंबड्या पाळण्यासाठी सर्वसाधारण अडीशे स्क्वेअर फुटांची जागा लागते.
जागेची कमी असल्यास शेतकरी बटेर पालन सुद्धा करू शकतो बटेला अनेक ठिकाणी लावावी असे सुद्धा म्हणतात. लावायचे पक्षी पस्तीस दिवसात विक्रीयोग्य होतात व 45 दिवसांनी अंडी उत्पादन सुरू होते एक दिवसाचा पक्षी सोळा ते 18 रुपये याप्रमाणे मिळतो व त्यानंतर 35 दिवसात तो पक्षी विक्रीसाठी तयार होतो 40 ते 50 दरम्यान पक्षाला तयार करण्यास खर्च येतो व बाजारामध्ये तो पक्षी 60 ते 75 रुपये नगाप्रमाणे आपण विक्री करू शकतो. बटेर पक्षी पाळण्याचा एक फायदा म्हणजे एका कोंबडी साठी लागणारे जागेत आपण 10 बटेर पक्षी पाळू शकतो. व कमी काळात आपले पैसे आपण त्यातून मोकळे करून घेऊ शकतो.अधिक माहितीसाठी आपण पॅराडाईस पोल्ट्री फार्म या वेबसाइटला भेट देऊ शकता व विदर्भातील कोणाला कुकुट पालना बद्दल माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता.
एक टिप्पणी भेजें