गाव सोडून शहरात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच एक स्वप्न असते , कि आपलं एक स्वतःच घर असावं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण दिवसरात्र मेहनत घेत असतो.
भाड्याच्या घरात राहून भाड भरण्यापेक्षा स्वतःच घर घेउन बँकेचा हप्ता भरलेला कधीही योग्यच ठरेल.परंतु घराच्या किंमती आणि घर घेतेवेळी होणारी फसवणूक अशा समस्यांमुळे अनेक जण घर घेउ शकत
सविस्तर पाहुयात
स्टॅम्प ड्युटी -
फ्लॅट नावावर करण्यासाठी बिल्डर आणि ग्राहक यांच्यामध्ये खरेदीखत होते वेळेस सरकारला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. कोरोना महामारी येण्याअगोदर स्टॅम्प ड्युटी मेट्रो सिटी मध्ये ५% + १% मेट्रो टॅक्स असा ६% टॅक्स लागत होता. कोरोना महामारीनंतर महाराष्ट्र सरकारने यामध्ये ३%कटोती केली आहे. म्हणजेच तुम्ही आता फ्लॅट घेण्यासाठी गेला तर तुम्हला २% स्टॅम्प ड्युटी आणि १% मेट्रो टॅक्स म्हणजे एकूण ३% एव्हडीच स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे. स्टॅम्प ड्युटी कमी झाल्यामुळे दोन फायदे होणार आहेत. एक म्हणजे फ्लॅट ची किंमत कमी होणार आहे. आणि दुसरा तुम्हला द्यावे लागणारे डाउन पेमेंट सुद्धा कमी होणार आहे.
रजिस्ट्रेशन -
खरेदीखत करतेवेळी रजिस्ट्रेशन चे पेमेंट करावे लागते. या टॅक्स मध्ये काही फरक झालेला नाही. यामध्ये खरेदीखताची किंमत तीस लाख किंवा त्याच्या पेक्षा कमी असेल तर १% टॅक्स भरावा लागतो आणि तीस लाखापेक्षा जास्त असेल तर तीस हजार असते .
जीएसटी -
२०१९ पासून जीएसटी हा टॅक्स भारत सरकारने लागू केला. सुरवातीला रिअल इस्टेट मध्ये १२% जीएसटी होता या मध्ये ६% स्टेट गव्हरमेंट आणि ६% सेंटर गव्हरमेंट असा टॅक्स विभागला जायचा. परंतु रिअल इस्टेट मार्केट डाउन होत गेल्यामुळे सरकारने वेळोवेळी टॅक्स कमी केले. आता जर आपली खरेदीखत ची किंमत ४५ लाखनपेक्षा जास्त असेल तर तुम्हला ५% जीएसटी भरावा लागेल आणि खरेदीखत ची किंमत ४५ लाखानपेक्षा कमी असेल तर १% जीएसटी भरावा लागेल.





एक टिप्पणी भेजें